Unmasking Happiness | पोस्ट कोव्हिडमध्ये भूक समस्या गंभीर

गोविंद डेगवेकर
Saturday, 16 January 2021

कोरोनाच्या संकटात संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडली. त्याचे परिणाम आता विविध प्रकारे समोर येत आहेत. काही दृष्य स्वरूपात, तर काही अदृष्य. आर्थिक शक्तीवरच परिणाम झाल्याने काही देशांमध्ये दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या संकटात संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडली. त्याचे परिणाम आता विविध प्रकारे समोर येत आहेत. काही दृष्य स्वरूपात, तर काही अदृष्य. आर्थिक शक्तीवरच परिणाम झाल्याने काही देशांमध्ये दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत निर्माण झाली आहे. त्याच अनुषंगाने भुकेचा प्रश्‍न गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे...

कोरोनाच्या संकटामुळे जगाचे झालेले आर्थिक नुकसान हे अगणित या ढोबळ शब्दाने निर्देशित करावे लागेल. तरीही त्याचे कुठेतरी मोजमाप होणे गरजेचे आहे. त्यातील एक म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती मांडणारा सहामाही अहवाल. जागतिक बॅंकेने तो अलीकडेच प्रसिद्ध केला. यात त्यांचा होरा असा आहे की, २०२० मध्ये जागतिक अर्थव्यवस्था ४.३ टक्‍क्‍यांनी खालावली. या नुकसानीची तुलना जागतिक मंदी आणि दोन जागतिक युद्धांशी केली जाऊ शकते. दोन्ही युद्धकाळांत पाश्‍चिमात्य देशांत भुकेचा डोंब उसळला होता आणि भारतात तो दुष्काळांमुळे. १९७२ सालचा भारतातील सर्वाधिक भीषण दुष्काळ होता. त्यानंतर देशातला सकल भुकेचा प्रश्‍न हरितक्रांतीने सोडवल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट करण्यात आले आणि येत आहे. आज कोरोनानंतर म्हणजे पोस्ट कोव्हिडमध्ये भुकेचा प्रश्‍न पुन्हा निर्माण झाला आहे.

Unmasking Happiness | डिस्चार्जनंतर घ्यावयाची काळजी आणि उपचार

जगातील सुमारे ६९ कोटी लोकांकडे पुरेसे अन्न नाही. त्याच वेळी कोरोनामुळे अर्थचक्र रुतल्याने येत्या काळात आणखी १३ कोटी लोकांची भर पडलेली असेल. भुकेल्यांची संख्या जसजशी वाढत जाईल तसतसा असंतोषाचा
वणवा काही देशांत पसरण्याची भीती रोम येथील जागतिक अन्न
कार्यक्रम संस्थेने व्यक्त केली आहे. आजवरसततच्या दुष्काळामुळे काही देशांतील भुकेचा निर्देशांक वाढता आहे.

अन्नोपज, वितरण, क्षुधाशांती...
दुष्काळ हा काही तासांत जाहीर करता येत नाही. किंबहुना तो जाहीर करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्यांना मूर्खात गणले जाऊ शकते. संकट दरवाजावर उभे असतानाच त्याला आत न शिरू द्यायचे झाल्यास दार भरभक्‍कम ठेवायला हवे. कोरोना संकटाने अनेकांना गाफील असताना पकडले आहे. याच मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने देशांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. भुकेल्यांना दोन वेळचे पोटभर अन्न पुरविण्याची हमी भविष्याकडूनच मिळू शकते. त्यासाठी भविष्याचीच पुनर्रचना करावी लागेल. यासाठी यंदा संयुक्त राष्ट्रांची अन्न साखळी परिषद होत आहे. यात अन्नाची उपज, त्याचे वितरण आणि प्रत्येकाची भूक भागविण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी या परिषदेत कृतिआराखडा आखला जाईल.

भुकेल्यांचा देश ः येमेन
 दोन कोटी ८५ लाख देशाची लोकसंख्या
 ८० टक्‍के लोकसंख्या अन्न, औषधे, वस्त्र आणि निवारा इत्यादींसाठी सरकारी मदतीवर अवलंबून
 २ कोटी अतितीव्र कुपोषित बालके
 ३,५०० आरोग्य केंद्रे हवाई हल्ल्यात उद्‌ध्वस्त
 किमान १००० केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू

Unmasking Happiness Severe appetite problems in post covid

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unmasking Happiness Severe appetite problems in post covid