#Lockdowneffect : मुंबईतील शिक्षकांवरही बिनपगारी रजेची वेळ

सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 22 मे 2020

कोरोनाच्या आक्रमणामुळे कोलमडत असलेले अर्थव्यवस्थेचे परिणाम दूरवर दिसू लागले आहेत. शुल्क भरले जात नसल्यामुळे शाळांना आर्थिक चणचण भासत आहे आणि त्यांनी शिक्षकांना बिनपगारी रजेवर पाठवले असल्याचे समजते.

मुंबई : कोरोनाच्या आक्रमणामुळे कोलमडत असलेले अर्थव्यवस्थेचे परिणाम दूरवर दिसू लागले आहेत. शुल्क भरले जात नसल्यामुळे शाळांना आर्थिक चणचण भासत आहे आणि त्यांनी शिक्षकांना बिनपगारी रजेवर पाठवले असल्याचे समजते.

मुंबईत अनेक मोठ्या शाळा आहेत. त्यांच्या विविध उपनगरात शाखा आहेत. शाळा मार्चच्या मध्यापासून बंद आहेत. शाळाच नाही तर शुल्क कसे अशी विचारणा करीत पालकांनी त्यास नकार दिला आहे. त्यातच आता शाळा जूनमध्ये सुरु होण्याची शक्यताही कमी दिसत आहे, त्यामुळे शाळांचे उत्पन्न कमी झाले आहे, त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर खर्च कमी करण्याचे ठरवले आहे. त्यानुसारच बिनपगारी रजा घेण्यास सांगितले आहे.

सर्दी खासी ना कोरोना हुआ ! अरे बापरे 'या' आजाराचा वाहक तुमच्या फ्रिजमध्येच लपून बसलाय...

शाळा सुरु होईपर्यंत पगार देणे अशक्य आहे, असे शाळा संचालकांनी शिक्षकांना सांगितले आहे. त्यापूर्वीच बिगर शिक्षकी कर्मचाऱ्यांनाही भरपगारी रजेवर पाठवले आहे, असे सांगितले जात आहे. शाळांच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबाची आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. बिनपगारी पाठवलेले अनेक जण त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमवते सदस्य आहेत, असे सांगितले जात आहे.

आम्ही कोणालाही कमी केलेले नाही. पण सूचनांचे पालन केले नाही. शिकवणे चांगले नसेल तर निर्णय घेण्यात येईल. आता काही शिक्षकांनी ऑनलाईन शिकवण्यास तयार नसल्याचे सांगितले आहे. त्यांना ब्रेक घेण्यास आम्ही सांगितले आहे, असे शाळा प्रमुख सांगतात. बिनपगारी रजा देण्यात आलेल्या काही शिक्षकांनी आपणास ऑनलाईन शिकवण्याचा पर्यायच दिला नाही असे सांगितले आहे. शाळा संचालकांनी पालकांची आर्थिक परिस्थिती सध्या चिंताजनक आहे, त्यामुळे ते शुल्क भरण्यास तयार नाहीत, असेही सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unpaid leave for teachers in Mumbai too