जेट एअरवेजचे वैमानिक जाणार संपावर

वृत्तसंस्था
शनिवार, 30 मार्च 2019

मुंबई - सध्या जेट एअरवेज कंपनी सध्या चांगलिच संकटात आहे. त्यातच आता कंपनिच्या संकटात आणख भर पडली आहे. कंपनीचे सुमारे 1 हजार वैमानिक, एक एप्रिलपासून संपावर जाणार आहे. विमानांचे उड्डाण न करण्याचा निर्णय वैमानिकांनी घेतला आहे. 

बँकांकडून मदत मिळवण्यात अपयश आल्यानंतर लगेचच वैमानिकांनी हा निर्णय घेतल्याने कंपनीसमोर अजचणी निर्माण झाल्या आहेत. 1100 वैमानिकांच्या प्रतिनिधीत्त्वाचा दावा करणाऱ्या नॅशनल एव्हिएटर्स गिल्डने गेल्या 31 मार्चपर्यंत थकित वेतन न दिल्यास, तसेच पुनर्जीवन योजनेची स्थिती स्पष्ट न झाल्यास 1 एप्रिलपासून एकही विमान उडणार नसल्याचे सांगणार आहे. यानंतर काही दिवसांत कर्जातून बाहेर येण्यासाठी तयार करण्यात आलेल्या योजने अंतर्गत एअरलाइन्सचे व्यवस्थापन एसबीआय बँकेच्या हाती गेले होते. 

त्यातच नरेश गोयल यांनी कंपनीच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे कंपनीच्या वाटेतील अडथळे दूर होतील अशी शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर स्पर्धेतील स्पाइसजेट आणि इंडिगो आपले 'प्राइज वॉर' सुरूच ठेवण्याची शक्यता आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unpaid for months Jet pilots seek nod to go on leave