बेफाम दुचाकीस्वाराची मुंबईच्या रस्त्यावर स्टंटगिरी; थोडक्यात वाचला जीव

बेफाम दुचाकीस्वाराची मुंबईच्या रस्त्यावर स्टंटगिरी; थोडक्यात वाचला जीव

घाटकोपर - मुंबई मधील दुचाकीस्वाराची स्टंटगिरी दिवसेंदिवस जीवघेणी ठरत आहे. अशाच एका स्टंटगिरी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये दोन तरुण रस्त्यावर बाईक चालवत असताना त्यावर उभे राहून स्टंट करताना दिसत आहे. यातील पुढे असणाऱ्या एका तरुणाचा तोल जाऊन तो खाली वेगात कोसळतो सुदैवाने मागे कोणते वाहन नसल्याने त्याचा जीव वाचला असल्याचे या व्हिडीओ मध्ये दिसते. हा व्हिडीओ विक्रोळी पार्क साईट मधील सावरकर मार्ग वरील असल्याचे बोलले जाते. हा व्हिडीओ कधीचा आहे? आणि हे दोन तरुण कोण आहेत याचा विक्रोळी पार्क साईट पोलीस तपास करत असून तरुणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकेही तयार केली आहेत.
 

पत्नी आणि दोन मुलांना मागे ठेऊन कैलास यांनी स्टेशन ऑफिसमध्येच स्वतःला संपवलं, मन स्तब्द करणारी घटना

मुंबई : मुंबईमध्ये कधी काय होईल कुणालाच सांगता येणार नाही. मुंबई एक असं शहर आहे जे शहर कुणालाही रिकाम्या पोटी झोपू देत नाही. मात्र या शहरात नागरिकांवर कामाचाही प्रचंड ताण आहे. प्रचंड स्पर्धा असल्याने प्रत्येकजण कामाच्या वजनाखाली दबलेला आहे. कामाच्या टेन्शनमुळे, घरच्या प्रेशरमुळे कोण कधी काय करून घेईल काही सांगता येत नाही.

नुकतीच मुंबईतील विद्याविहार रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडलीये. मुंबईतील सेंट्रल लाईनवर विद्याविहार हे स्थानक आहे. या स्थानकात आपल्याच ऑफिसमध्ये एका रेल्वे अधिकाऱ्याने आत्महत्या करत स्वतःचं जीवन संपवलं आहे. सदर घटना कालची आहे. सदर व्यक्तीची ओळख पटली असून या व्यक्तीचे नाव कैलास कदम असं आहे. कैलास विद्याविहार स्थानकात चीफ बुकिंग सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. 

Unruly two-wheeler stunt on Mumbai streets video viral

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com