मुंबई : अंधेरीतील महाकाली गुफेजवळ डुरक्या घोणस सापाचा वावर | Mumbai snakes update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Common sand boa snake

मुंबई : अंधेरीतील महाकाली गुफेजवळ डुरक्या घोणस सापाचा वावर

मुंबई : दोन दिवस आलेल्या अवकाळी पावसामुळे (untimely rain) सापांचा (snakes) वावर वाढला आहे. एरव्ही शहरी जीवनापासून लांब राहणारा डुरक्या घोणस (common sand boa) ही सापांची दुर्मिळ प्रजाती सोमवारी अंधेरीतील (Andheri) महाकाली गुफेजवळ (Mahakali caves) आढळून आली. हा साप तब्बल सहा वर्षानंतर मुंबईत पाहायला मिळाल्याचे सर्प मित्र (snake handler) संघटनांनी सांगितले.

हेही वाचा: घराचं आमिष दाखवून मुंबईतल्या १६ जणांना कोट्यवधींचा गंडा; पती-पत्नीवर गुन्हा

डुरक्या घोणस हा मुळात सह्याद्री पर्वत रांगेत दिसतो. मात्र मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे सह्याद्री पर्वत रांगेचाच भाग आहे. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून हा बिनविषारी साप अंधेरीच्या महाकाली गुंफेत आला असावा. रविवारी मुंबईत पाऊसही होता. त्यामुळे पावसाच्या पाण्यात हा शहरी भागांत आल्याची प्राथमिक शक्यता असल्याची माहिती ‘रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर’ (रॉ) या प्राणीप्रेमी संस्थेच्या प्रमुख रितू शर्मा यांनी दिली.

मुंबईत सध्या बांधकामं वेगाने सुरु आहेत. त्यामुळे तुम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानानजीकच्या बांधकाम क्षेत्राजवळ असाल तर एखादा सरटणारा प्राणी दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही शर्मा म्हणाले. डुरक्या घोणस हा बिनविषारी साप वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार, चौथ्या वर्गवारीत संरक्षित आहे. हा साप अवैधरित्या जवळ बाळगणा-यास पंचवीस हजारापर्यंत दंड होऊ शकतो.

loading image
go to top