अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारांमध्ये होणार वाढ

अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारांमध्ये होणार वाढ

मुंबई : अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे डिसेंबर महिन्यात संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होणार असून कोरोनाचा संसर्ग झालेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मधूनच कधी कडाक्याची थंडी जाणवते तर कधी वातावरण ढगाळ होऊन अकाली पाऊस पडायला लागतो. कडक ऊन असतानाही हवेत गारवा जाणवतो. या बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. वातावरणात झालेल्या या बदलांमुळे साथीचे म्हणजेच संसर्गजन्य  आजार वाढण्याची शक्यता जास्त असते. गेल्या आठ दिवसापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि मळभट वातावरणामुळे अंग मोडून पडणं, अनुत्साही वाटणं, डोकं दुखणं अशा आजारात वाढ झाली आहे.

अपेक्स रुग्णालय समूहाचे  छातिरोग -फुफ्फुसविकारतज्ञ  डॉ. जिग्नेश पटेल यांनी सांगितले की, "अचानक वाढलेला उष्मा आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. या आजारांवर वेळीच उपाय केले नाही तर ते आजार बळावण्याची शक्यता असते. सकाळी थंडी व दुपारी पडलेल्या कडक उन्हामुळे नागरीक विशेषतः लहान मुले तहान भागवण्यासाठी  शितपेय व थंड पाण्याचे मोठ्या प्रमाणात सेवन करत असल्यामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, कफचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे लहान मुलांना थंड शितपेय व आईस्क्रीम देणे टाळावे. 

सध्या मुंबई आणि लगतच्या शहरांमध्ये धुक्याची चादर आपणास अनुभवास मिळत असली तरी हे धुके आरोग्यासाठी धोकादायक आहे, कारण दिवस रात्री शहरातील प्रमुख रस्ते, उपनगरांना जोडणारे रस्ते अक्षरश: हजारो वाहने ये-जा करत असल्यामुळे वाहनातून निघणारा धूर या धुक्यात मिसळल्यामुळे धुरके तयार होत असून याचा गंभीर परिणाम मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार असणाऱ्या रुग्णांना तसेच ज्यांना कोरोनाची लागण झालेली होती अशा नागरिकांना हा काळ धोकादायक आहे. 

बदललेल्या वातावरणाचा परिणाम-

या बदललेल्या वातावरणामुळे मानसिक अस्थैर्यही निर्माण होत असून नैराश्य, चिडचिडेपणा, डिप्रेशन या अशा गोष्टी नागरिकांमध्ये बळावत आहेत. दमट वातावरणामुळे ज्येष्ठ नागरीकांमध्ये बीपी कमी होऊ सातत्याने घाम येणे, दम लागणे, अशक्तपणासारखे विकार उद्भवत आहेत. त्यामुळे काम असेल तरच  घराबाहेर पडावे. 

कोरोना झालेल्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक-

स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे जेष्ठ फिजिशियन डॉ प्रवीण भुजबळ यांनी सांगितले की, वैद्यकीय अनुमानानुसार भारतात हिवाळ्यामधे श्वासासंबंधीत आजार वाढीस लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लू व दम्याचे आजार या काळात वाढीस लागतात म्हणूनच ज्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे अशा नागरिकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे कारण त्यांची श्वसन यंत्रणा कोरोनाच्या संसर्गामुळे कमकुवत झालेली असते. कोरोना आजारातून बरे झालेल्या 10 ते 20 टक्के रुग्णांमध्ये फायब्रोसिस म्हणजेच फुफुसामध्ये जंतूंचा संसर्ग होण्याचे प्रमाण दिसून आले आहे ,अशा रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होणे, धाप लागणे, खोकला येणे व थकवा जाणवणे अशी लक्षणे आढळून येतात. 

उत्तर-पूर्वेकडून थंड हवा आणि पश्चिमेकडून येणारी उबदार हवा यांच्या मिश्रणामुळे सध्या मुंबई आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर धुरक्याचे साम्राज्य पसरले आहे. या धुरक्यामध्ये वाहनांचा धूर मिसळत असल्याने ‘क्रोनिक ऑब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मनरी डिसीज’ (सीओपीडी) अर्थात काळ्या दम्याच्या श्वसनविकाराच्या गंभीर आजाराचा विळखा नागरिकांना पडत आहे."

Untimely rains and changing climate will an increase in infectious diseases 

=------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com