मूक बधिर बाल विकास केंद्राच्या माहितीपटाचे अनावरण

मूक बधिर बाल विकास केंद्राच्या माहितीपटाचे अनावरण

बोर्डी - ठाणे जिल्हा स्री शक्ती जागृती समिती संचलीत मूक बधिर बाल विकास केंद्राच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेणाऱ्या जिद्द स्वावलंबनाची या माहितीपटाचा अनावरण समारंभ मुंबई महानगर पालिकचे माजी नगरपाल मोहनभाई पटेल यांच्या शुभहस्ते पार पडला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालती चुरी सचिव मधुमती राऊत, मुख्यधिपिका शोभा चव्हाण, माजी नगराध्यक्ष राजेश पारेख,लायन दिनेश रॉय, राज्य चिकु उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी  आदी मान्यवर पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे औचित्य साधून मुक बधिर शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना प्रेमचंद दाभाडे यांनी मुक्या मुलाना बोलले करण्याचे आमचे काम आहे कुठलच ज्ञान नसलेली मुलं येथे शिकण्या साठी येतात त्यांना घडविण्यात आम्हाला मोठा आनंद मिळतो असे भावपुर्ण उदगार काढले.

लघु चित्रपटाचे निर्माते मंदार कारंडे यांना स्मृती चिन्ह देवून सन्मानीत करण्यात आले. अध्यक्ष पदावरुन बोलतांना मालती चुरी यांनी सांगितले शाळेचे शिक्षक देवाच काम करीत आहेत. सेवाभावी भावनेने त्यांचे काम चालते म्हणुनच येथे शिकलेले विद्यार्थी सर्वगुण संम्पन्न होतात असा विश्वाश व्यक्त केला. आणि संस्थेला सहकार्र करण्यचे आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com