मुंबईकरांनो काळजी घ्या! येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा - IMD

मुंबईत पावसाची संततधार सुरु असल्याने सखल भागात पाणी साचले आहे.
Heavy Rain in Mumbai upcoming 24 hours
Heavy Rain in Mumbai upcoming 24 hoursesakal
Summary

मुंबईत पावसाची संततधार सुरु असल्याने सखल भागात पाणी साचले आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने दमदार एंट्री केली आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) गुरुवारी मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्टही जारी केला होता. यात नाशिक, पुणे आणि पालघरचा समावेश होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा पुढील २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. (Heavy Rain in Mumbai upcoming 24 hours)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईत पावसाची संततधार सुरु असल्याने सखल भागात पाणी साचले आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केलं आहे.

Heavy Rain in Mumbai upcoming 24 hours
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू आज मुंबईत; पण उद्धव ठाकरेंना भेटणार नाहीत!

मुंबईत गेल्या आठवड्यापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी जुन्या, इमारती आणि दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. संततधार पावसामुळे गेल्या आठवड्यात मुंबईतील तलाव ओसंडून वाहत आहेत. आज नाशिक, पालघर, रायगड, पुणे, सातारा, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ठाणे, रत्नागिरी, लातूर, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याआधी आज भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे एसडीआरएफच्या पथकाने १५ जणांची सुटका केली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बीड, लातूर, जालना, परभणी आणि इतर अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या घाट भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.

Heavy Rain in Mumbai upcoming 24 hours
सामंत-राऊतांच्यातील वाद विकोपाला, राजकीय युद्धात मैत्रीत पडणार दरार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com