सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी सर्वात मोठी अपडेट; फॉरेंसिक टीमच्या अहवालातून महत्वपूर्ण खुलासा

तुषार सोनवणे
Thursday, 24 September 2020

सुशांतची हत्या झाल्याचे सध्यातरी कुठलेही पुरावे मिळाले नसल्याची माहिती, सेंट्रल फॉरेंसिक सायन्स लॅबमधील सूत्रांनी दिली आहे

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात गेल्या काही महिण्यांपासून तपास यंत्रणांची कसून चौकशी सुरू आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात वेगवेगळे तर्क वितर्क लढवण्यात येत असून, याप्रकरणाने राजकीय वळण घेतले की काय अशी शंका सध्या अनेकांकडून घेतली जात आहे. तरी याप्रकरणाचा तीढा आता सूटन्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

शहरातील विकासकामांचा फटका ? लॉकडाऊननंतर पावसाने मुंबईकरांना रडवले

सुशांतची हत्या झाल्याचे सध्यातरी कुठलेही पुरावे मिळाले नसल्याची माहिती, सेंट्रल फॉरेंसिक सायन्स लॅबमधील सूत्रांनी दिली आहे.या टीमने सुशांतच्या वांद्रे येथील राहत्या घरी घटनेचा आढावा घेतला होता. त्या ठिकाणी टीम ने क्राईम सीन देखील रिक्रीएट केला होता. दरम्यान, फॉरेंसिक टीमने हा अहवाल केंद्रीय अन्वेशन विभागाला (सीबीआय) दिला आहे. सीबीआय़ यासंबधी लवकरच माहिती देण्याची शक्यता आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्यामाहितीनुसार, सुशांतच्या मृत्यूचे कारण पार्शियल हँगिंग म्हणजेच मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पाय फाशीच्या दरम्यान, पुर्णतः हवेत नव्हते. तर त्याचा पाय जमिनीला लागलेला होता. त्याने ज्या कपड्याने गळफास घेतला त्या कपड्याच्या जास्तीत जास्त वजन सांभाळू शकण्याच्या क्षमतेबाबतही फॉरेंसिक टीमने  अहवाल तयार केला आहे.

फॉरेंसिक टीमच्या रिपोर्टनुसार सुशांतने दोन्ही हातांनी गळफास लावून घेतला असावा, त्याच्या गळ्यावर पडलेल्या खुनांच्या गाठीबाबतही या रिपोर्टमध्ये उल्लेख आहे. सुशांतच्या खोलीमधून जप्त करण्यात आलेल्या कपड्यांचाही फाशी लावून घेण्यासाठी वापर करण्यात आल्याची माहिती या रिपोर्टमध्ये आहे.

मुंबई पालिकेत 30 टक्के वैद्यकीय पदे रिक्त, आपत्तीकाळातील आरोग्य सेवेवर परिणाम

सुशांतसिंहच्या मृत्यू नंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनवरही आता कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. त्यात, रिया चक्रवती सह, दीपिका पादूकोन, श्रद्धा कपूर, सारा अली खान आदी बड्या अभिनेत्रींच्या अडचणीत वाढ होणार आहे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: update on Sushant Singhs death case Important revelations from the forensic team report