Uran Fire: उरणमध्ये अग्नितांडव, गोदामात प्रचंड स्फोट; हवेत धुराचे लोट, नागरिकांना श्वास घेण्यास त्रास

Uran Fire in a warehouse : उरणमध्ये गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आहे.
Uran Fire

Uran Fire

ESakal

Updated on: 

उरण : उरण येथील एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. प्लाटीनम लाँजिस्टीक या मालाची साठवणूक करणाऱ्या गोदामाने पेट घेतला असून गोदामात केमिकलचा साठा असल्याने मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे आगीचा मोठा भडका उडाला असून परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...