पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्या मुलांना ताकीद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

उरण - स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात "पाकिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा देणाऱ्या सात तरुणांना पोलिसांनी ताकीद देऊन सोडून दिले. या मुलांविरोधात कोणीही तक्रार वा पुरावा न दिल्यामुळे पोलिसांनी तरुणांची मुक्तता केली.

स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम खोपटे गावात सुरू असताना शाळेतील मुले "भारतमाता की जय' अशा घोषणा देत होते. त्या वेळी या तरुणांनी "पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. या घटनेची फारशी दखल घेण्यात आली नव्हती; मात्र 18 ऑगस्ट रोजी खोपटे येथे झालेल्या सभेवेळी सत्यवान भगत यांनी मुलांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्या वेळी आमदार मनोहर भोईर यांनी पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगानेच पोलिसांनी चौकशी करून या सात मुलांना ताब्यात घेतले; मात्र त्यांच्या विरोधात कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नसल्याने पोलिसांनी मुलांना नोटीस व ताकीद देऊन सोडून दिले.

Web Title: uran news Warning to Pakistan's announcement