"एकाही डिलेव्हरी बॉयला राज्यात फिरू देणार नाही", मनविसेचा फ्लिपकार्टला इशारा

"एकाही डिलेव्हरी बॉयला राज्यात फिरू देणार नाही", मनविसेचा फ्लिपकार्टला इशारा

मुंबई : अमेझॉननंतर मनसेने आपला मोर्चा फ्लिपकार्टकडे वाळवलाय. फ्लिपकार्ट ही देशभरात ऑनलाइन शॉपिंगची अग्रगण्य कंपनी असून विविध राज्यात या कंपनीचा मोठा विस्तार आहे. अनेक राज्यांमध्ये तिथल्या प्रादेशिक भाषांमध्ये या कंपनीचा व्यापार चालतो. महाराष्ट्रातूनही फ्लिपकार्ट कंपनीचा मोठा व्यवहार चालतो. राज्यात सदर कंपनीच्या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे ऑनलाइन शॉपिंग करण्यात मराठी ग्राहकांची संख्या देखील मोठी आहे.

महाराष्ट्रात मराठी भाषा बंधनकारक असताना फ्लिपकार्ट कंपनीचा व्यापार इतर भाषांमध्ये होतोय. यामध्ये हिंदी, इंग्रजी, तामिळ, मल्याळम आदी भाषांचा समावेश आहे. यामध्ये मराठी भाषेचा वापर करण्यात आलेला नाही. 

फ्लिपकार्ट कंपनीकडून मराठी भाषेवर होत असलेला अन्याय लक्षात घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी सदस्य प्रमोद मांढरे यांनी 14 ऑक्टोबर रोजी मुंबईतील विद्याविहार येथील फ्लिपकार्ट कंपनीच्या मुख्यालयात जाऊन कंपनीच्या डायरेक्टर यांना इशारा देत मोबाईल ऍप्लिकेशनवर मराठी भाषेचा वापर करावा यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र आठ दिवस उलटूनदेखील कंपनीकडून कोणतीच दखल न घेण्यात आल्याने मनवीसेच्या शिष्टमंडळाने पुन्हा कंपनीच्या मुख्यालयात जाऊन फ्लिपकार्टच्या डायरेक्टर यांच्याशी थेट संपर्क साधला. 

फ्लिपकार्टकडून लवकरच मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये मराठीमध्ये व्यवहार करता येईल असं सांगण्यात आलं आहे. मनविसे यावर समाधानी नसल्याने पुढील दोन दिवसात मोबाईलवर मराठीचा वापर व्हावा किंवा महाराष्ट्रात फ्लिपकार्टच्या डिलेव्हरी करणार्यांना फिरू देणार नाही असा पवित्रा घेण्यात आलाय. सोबतच राज ठाकरेंसोबत पत्रव्यवहार करावा असं देखील मनविसे नेत्यांनी कंपनीच्या डायरेक्टर यांना सांगितलं आहे. 

महाराष्ट्रात मराठी भाषेचा जर अपमान होत असेल तर तो अपमान मनसे सहन करणार नाही असेही मांढरे म्हणाले. यावेळी मनविसे घाटकोपर पश्चिमचे विभाग अध्यक्ष संदेश मोरे, आशिष गावडे, समीर सावंत, प्रवीण बांदिवडेकर, तुषार शिंदे आदी उपस्थित होते. 

use marathi launguage on flipkart mobike app or we will not allow delivery boy for delivery

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com