esakal | 'न यहाँ रहने कि चाह, न गाव जाने कि राह'
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

प्रमाणपत्र मिळवताना परप्रांतिय कामगारांच्या नाकीनऊ; नेमकी माहितीही मिळेना

'न यहाँ रहने कि चाह, न गाव जाने कि राह'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोरेगाव : गोरेगाव, दिंडोशी, जोगेश्वरी, ओशिवरा, वर्सोवा आदी भागात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय मजूर राहतात. हे मजूर प्रामुख्याने झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार राज्यातील आहेत. गेल्या दिड महिन्यांपासून कामगार घरी जाण्यासाठी धडपड करत आहेत. आता सरकारने परवानगी दिली असली तरी त्यासाठी परवानगीचे कागपत्र मिळवताना त्यांच्या नाकी नऊ येत आहेत.  त्यामुळे आमच्यासाठी रेल्वेची सोय करुनही नेमके जायचे कसे, याबद्दल काहीही समजत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'न यहाँ रहने की चाह, न गाव जाने की राह', अशी आमची स्थिती झाल्याचे एका मजुराने सांगितले.

डेंजर प्रकार ! वडा पाव खा, कोरोना पळवा... मुंबईत काहीही होऊ शकतं!

वसई विरार, डहाणू, भिवंडी व इतर ठिकाणांतील मजूर आपापल्या गावी परतण्यास आता सुरूवात झाली आहे. अशात मुंबईतील उत्तर भारतीयांचाही संयम सुटत चालला आहे.  दिंडोशी मधील कुरार येथे हजारो कामगार कारखान्यात काम करतात व तेथेच एका ठिकाणी मोठ्या दाटीवाटीने राहत आहेत. एका छोट्याशा खोलीत दहा ते पंधरा मजुरांना रहावे लागत आहे. आता त्यांना कोरोनापेक्षा भुकेची आणि अन्नाची चिंता सतावत आहे. गावी परतण्यासाठी डाॅक्टरांचे वैद्यकिय प्रमाणपत्र त्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाची बाधा झाल्यास गावी जाण्यासही मिळणार नसल्याची भिती त्यांना आहे. त्यामुळे हे मजुर पालिकेतर्फे वितरित केले जाणारे अन्न घेण्यासही बाहेर पडण्यासही घाबरत आहेत. तसेच, प्रमाणपत्र, रेल्वे सुविधा याबाबत निश्चित माहितीही एका ठिकाणी मिळत नसल्याचे मजुरांनी सांगितले आहे.

...नाहीतर येत्या काळात त्या खासगी डॉक्टर्सचे परवाने होणार रद्द!

पालिकेच्या पी उत्तर विभागाच्या सर्व झोपडपट्टी परिसरात व परप्रांतिय कामगार असलेल्या ठिकाणी आरोग्यदायी जेवण पुरविण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी व आरोग्यासंबंधी मदतही पालिका कर्मचारी करीत आहेत. जेवणात बदलते खाद्य पदार्थ देण्यावर आमचा भर आहे; मात्र आता कामगार या गरजां व्यतिरिक्तही अन्य मदतीविषयी विचारणा करत आहेत. याबद्दल सामान्य कर्मचाऱ्यांना माहिती नसते. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. 
-  संजोग कबरे,
सहाय्यक आयुक्त, पी उत्तर  विभाग

Uttar pradesh-Bihar's labour in big anxiety