भूमिपुत्रांच्या एकजुटीपुढे म्हाडाची माघार; उत्तरशीवमधील जमीन मोजणी स्थगित, प्रशासनाने पावले मागे घेतली

Kalyan News: महसूल व म्हाडा प्रशासनाकडून उत्तरशीव गावातील गुरचरण जमिनीची मोजणी केली जात होती. मात्र वेळीच भूमिपुत्रांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे प्रशासनाने कारवाई मागे घेतली.
Uttarshiv village Land Survey Postponed

Uttarshiv village Land Survey Postponed

ESakal

Updated on

डोंबिवली : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १४ गावांमध्ये प्रस्तावित म्हाडा प्रकल्पावरून निर्माण झालेला संघर्ष बुधवारी टोकाला पोहोचला. उत्तरशीव गावातील गुरचरण जमिनीची मोजणी करण्यासाठी महसूल व म्हाडा प्रशासनाचे अधिकारी दाखल होताच भूमिपुत्रांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अखेर वाढता तणाव आणि स्थानिकांचा तीव्र विरोध लक्षात घेता प्रशासनाला माघार घ्यावी लागली. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या थेट हस्तक्षेपानंतर जमीन मोजणीची कारवाई स्थगित करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com