esakal | उरणमध्ये लसीकरण मोहीम सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

उरणमध्ये लसीकरण मोहीम सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उरण : माझे कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेचा आदर करत शिवसेना उरण शहर शाखेतर्फे फिरते मोफत कोविड (Covid) लसीकरण मोहीम जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर व शिवसेना (shivsena) गटनेते गणेश शिंदे यांच्यातर्फे सुरू करण्यात आली.

हेही वाचा: उरण: चिर्लेत १० फुटी अजगराला जीवदान

उरण शहराच्या प्रत्येक विभागांतील नागरिकांसाठी 'एका फोनने लसीकरण टीम आपल्या दारी शिवसेनेची समाजसेवा आपल्या घरोघरी' या टॅगलाईन खाली सुरू केलेल्या उपक्रमाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. या वेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, शिवसेना गटनेते गणेश शिंदे, गणेश म्हात्रे, विनोद म्हात्रे, नगरसेवक अतुल ठाकूर, समीर मुकरी, गणेश पाटील, अरविंद पाटील उपस्थित होते.

loading image
go to top