esakal | लसीकरण तीन दिवस बंद, केंद्रावर गर्दी करु नये; पालिकेचं आवाहन

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination
लसीकरण तीन दिवस बंद, केंद्रावर गर्दी करु नये; पालिकेचं आवाहन
sakal_logo
By
समीर सुर्वे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई: लसींचा साठा उपलब्ध नसल्याने रविवारपर्यंत मुंबईतील सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांनाही या काळात लस मिळणार नाही. सोमवारी साठा मिळाल्यास लसीकरण सुरू होणार आहे. "लसींचा साठा उपलब्ध होईपर्यंत लसीकरण बंद राहणार आहे. शुक्रवारी लसींचा डोस मिळण्याची शक्‍यता कमी असल्याने पुढील तीन दिवस लसीकरण बंद राहील', असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले, "बुधवारी उशीरा लससाठा दाखल झाला. त्यामुळे लसीकरण केंद्र उशीरा सुरु झाली. बुधवारी फक्त 74 हजार लस मिळाल्या. गुरुवारी साठा मिळण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस लसीकरण केंद्र बंद असतील असे काकाणी यांनी नमूद केले. नागरिकांना लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये असे आवाहनही करण्यात आले आहे.

हेही वाचा: सचिन वाझेच्या अडचणीत वाढ, ACBकडे भ्रष्टाचाराच्या दोन तक्रारी दाखल

विशेष बाब म्हणून मुंबईला लस उपलब्ध करुन दिल्यास लसीकरण करता येऊ शकते. महापालिकेला मिळालेल्या 74 हजार लसींपैकी दुपारपर्यंत 50 हजार डोस वापरण्यात आले आहेत. त्यामुळे शुक्रवारसाठी लस उपलब्ध नसेल असेही सांगण्यात आले. 1 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात येणार होते. त्यासाठी महानगर पालिका 227 केंद्रही उभारणार होती. मात्र आता 2 मे पर्यंत लसीचा साठाच उपलब्ध होण्याची शक्‍यता कमी असल्याने पहिले दोन दिवस लसीकरण होणे शक्‍य नाही.

हेही वाचा: मोठी बातमी: आजपासून तीन दिवस मुंबईतील लसीकरण बंद

नोंदणी शिवाय लस नाही

सुरुवातीला लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याने महानगर पालिकेने लसीकरण केंद्रावरच नोंदणी करुन थेट लस देण्यास सुरुवात केली. मात्र मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून लसीकरणाला प्रतिसाद वाढू लागला. तर एप्रिलपासून लसींची उपलब्ध कमी होऊ लागली. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ लागली आहे. यावर उपाय म्हणून आता पूर्व नोंदणी शिवाय लस न देण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे.

लसीकरणाच्या ऍप्लिकेशनवर नोंदणी करणाऱ्यांनाच पहिला डोस मिळणार आहे. थेट केंद्रावर येऊ नये असे आवाहनही काकाणी यांनी केले. तसेच दुसरा डोस त्याच केंद्रावर घ्यायचा असल्याने नोंदणी करण्याची गरज नाही. मात्र दुसऱ्या केंद्रावर डोस घ्यायचा असल्यास नोंदणी करावी लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

vaccination closed for three days do not crowd center bmc appeal