esakal | मुंबईत लसीकरणाचा वेग आणखी वाढणार | Vaccination
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination
मुंबईत लसीकरणाचा वेग आणखी वाढणार

मुंबईत लसीकरणाचा वेग आणखी वाढणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईत पालिकेकडून लसीकरणाचा वेग आणखी वाढवला जाणार आहे. मुंबईत जवळपास 94 टक्के नागरिकांचा पहिला डोस आणि 53 टक्के नागरिकांचा दुसरा डोस झालेला आहे. मात्र, अजूनही नागरिक लसीकरणासाठी पुढाकार घेत नसून घरातून बाहेर पडत नाहीत. सोसायटी, झोपडपट्ट्यांमधून नागरिकांनी बाहेर येऊन लसीकरण करुन घ्यावे यासाठी 10 ते 20 सोसायटींच्या मध्यवर्ती भागात महापालिकेच्या एखाद्या जागेत किंवा इतर विभागात जिथे जागा उपलब्ध होईल अशा ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु केले जाणार आहे. जेणेकरुन नागरिक एकाच ठिकाणी पोहोचतील आणि लसीकरण करुन घेतील.

झोपडपट्ट्यांमध्येही तात्पुरते लसीकरण केंद्र सुरु करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. शिवाय, ज्या सोसायट्यांचे लसीकरण झाले आहे अशा सोसायट्यांच्या बाहेर पूर्ण लसीकरण झालेली सोसायटी अशा आशयाचे फलक लावले जात आहेत.

या सर्व उपाययोजनांमुळे लसीकरणाचा वेग कायम राहणार असून यातून जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण पूर्ण झाले पाहिजे हा हेतू असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा: मुंबई : रस्ते मोकळे, मोजकीच वाहन रस्त्यांवर

जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणाचा प्रयत्न -

काकाणी यांच्या म्हणण्यानुसार, लसीकरण मोहिमेला आणखी गती देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. मुंबई लसीकरणात पहिल्या क्रमाकांवर आहे. 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी फार कमी शहरे आहेत ज्यांनी मुंबईसारका टप्पा गाठला आहे. ही गती कायम ठेवण्यासाठी पालिकेने लौचिक धोरणाचा अवलंब केला आहे. यामध्ये सोसायट्या, दाटीवाटीची क्षेत्र आणि झोपडपट्टयांमध्येही लसीकरण केंद्र सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, नियोजन देखील सुरु झाले आहे. जे लोक कामानिमित्त त्या ठिकाणी जात असतील आणि लसीकरण केंद्रांचे अंतर जास्त असल्याने त्यांना त्रास होऊ नये अशा ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु होईल आणि लसीकरण कार्यक्रमाला गती मिळेल.

loading image
go to top