मुंबई - जगाला महत्त्वाच्या लशींची निर्यात करणाऱ्या हाफकिन इन्स्टिट्यूटमधील यंत्रसामग्री जुनी झाल्याने त्याचा उत्पादनावर देखील दूरगामी परिणाम होताना दिसतो. या संस्थेला कात टाकण्यासाठी ४६५ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे..या संस्थेची उत्पादन क्षमता घटल्याने बहुतांश देशांत सर्पदंशावरील तसेच पोलिओ निर्मूलनासाठी हव्या असलेल्या लशींचा तुटवडा जाणवताना दिसतो. सध्या हाफकिन इन्स्टिट्यूटचे काम ठप्प असल्याची माहिती सूत्रांनी दिली. साप आणि विंचू दंशावरील लशींची भारताप्रमाणेच जगातील अन्य देशांमध्येही मोठी मागणी असते..महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत येणारी हाफकिन इन्स्टिट्यूट अशा लशी तयार करून त्या निर्यात करण्याचे काम करते मात्र सध्या येथे निधीअभावी उत्पादन होत नसल्याचे दिसून येते. अनेकांना केवळ लस उपलब्ध नसल्याने महागड्या औषधांचा आधार घ्यावा लागतो.या टंचाईवर तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. यासाठी पंधरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे..म्हणून संस्था तोट्यातसरकारी अनास्थेची ही कहाणी २०१८-१९ मध्ये सुरू झाली. शासनाला १६ कोटींवर नफा मिळवून देणाऱ्या या संस्थेला नूतनीकरणासाठी निधीच मिळाला नाही अन् फायद्यातील संस्था वेतन देयकांपोटी ५ कोटी रुपयांनी तोट्यामध्ये गेली. मागील वर्षापर्यंत हा तोटा अकरा कोटींवर गेला. सध्या राज्य सरकारकडून चौदा कोटींचे येणे आहे अन् संस्थेला नूतनीकरणासाठी १५ कोटी रुपये तातडीने हवे आहेत. संस्थेकडे कर्मचाऱ्यांना केवळ फेब्रुवारीपुरते वेतन देण्याएवढाच निधी आहे..किती निधी हवा? (प्रमाण - कोटी रुपयांत)१६५ - मुंबईत उत्पादनासाठी१०० - पिंपरीतील उत्पादनासाठी२०० - भविष्यातील प्रकल्पांसाठी२३० - व्यवसाय मिळेल८० - मंडळाला लाभ होणार.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.