CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

तीन दिवसात दुसऱ्यांना ही घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे.
Local Train
Local Train

मुंबई : वडाळा-सीएसएमटी लोकल सीएसएमटी रेल्वे स्थानकात रुळावरुन घसरल्याची घटना घडली आहे. तीन दिवसात दुसऱ्यांना ही घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. चाचणीदरम्यान ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. (Vadala CSMT Local train derailment at CSMT station due to trial second incident in a row in three days)

Local Train
Pune Lok Sabha Election 2024: आबा बागूल यांचं बंड झालं थंड! पटोलेंशी चर्चेनंतर धंगेकरांचा करणार प्रचार

परवा ट्रेनच्या चाचणीदरम्यान लोकल ट्रेन रुळावरुन घसरली होती. या घटनेत सुधारणा करण्यासाठी पुन्हा आज चाचणी घेण्यात आली. यावेळी एका रिकाम्या ट्रेनची चाचणी सुरु होती. पण सुरुवातीचा रुळाचा जो दोष होता तो पूर्णपणे निघू शकला नाही. त्यामुळं पुन्हा चाचणीदरम्यान रेल्वे रुळावरुन घसरली. (Latest Marathi News)

Local Train
Raj Thackeray: ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरे घेणार सभा! भेटीनंतर श्रीकांत शिंदेंनी सांगितली स्ट्रॅटेजी

नेमकं काय घडलं?

आज सकाळपासून ही चाचणी घेतली जात होती. ही चाचणी रात्रीच्या वेळी करता येत नाही कारण त्याचा परिणाम हा दिवसाच कळतो. ट्रॅकवर कुठे दबाव येतो हे दिवसाच कळू शकते, हीच बाब तपासताना चाचणी घेण्यात येणारी लोकलचा डबा हा रुळावरुन घसरला. त्यामुळं आजची चाचणी ही यशस्वी होऊ शकलेली नाही, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com