

Uddhav Thackeray Vaishali Darekar shiv sena setback
esakal
Uddhav Thackeray News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक राजकीय धक्का बसला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवलेल्या वैशाली दरेकर-राणे यांनी पक्षाच्या महिला जिल्हा संघटक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. वैयक्तिक कारणांमुळे पक्षाच्या कामाला वेळ देणे शक्य नसल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले असून, त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.