Vajreshvari Devi : वज्रेश्वरी, गणेशपुरी, सागाव मंदिर परिसराच्या बाबत महत्वाची बातमी; निधी....!

vajreshvari.
vajreshvari.sakal
Updated on

Vajreshvari Devi : राज्यात प्रसिद्ध असलेल्या वज्रेश्वरी व गणेशपुरीबरोबरच भिवंडी तालुक्यातील सागाव येथील पुरातन कानिफनाथ मंदिर, राहूर येथील कारवादेवी मंदिर आणि लोनाड येथील खंडेश्वरी महादेव परिसराच्या विकासकामांवर लादलेली स्थगिती उठवण्यात आली आहे. त्यामुळे या परिसराचा कायापालट करण्याच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे.

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी स्थगिती उठविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे प्रयत्न केले होते.

vajreshvari.
Thane News : मुख्यमंत्र्याचे ठाणे स्वच्छ हवेसाठी देशात तिसरे

वज्रेश्वरी व गणेशपुरी येथे दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी होते. या भाविकांना सुविधा मिळवून देण्याबरोबरच मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांवरून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने वज्रेश्वरी, गणेशपुरी, सागाव आणि राहूर येथील मंदिरांसाठी निधी मंजूर केला होता.

vajreshvari.
Thane Hospital News : कळव्याच्या 'त्या' रुग्णालयात गेल्या ७ महिन्यात झाला आहे १००० पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू !

त्यानुसार वज्रेश्वरी येथील मंदिराच्या पायऱ्यांवर शेड व सुशोभीकरणासाठी दोन कोटी ४० लाख, संरक्षक भिंत व सुशोभीकरणासाठी एक कोटी, गणेशपुरी येथे संरक्षक भिंत, सुशोभीकरण व शौचालयांसाठी एक कोटी रुपये, सागाव येथील पुरातन कानिफनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता, सुशोभीकरण आणि हायमास्ट दिव्यांसाठी दोन कोटी रुपये, अकलोली नदीलगत रस्त्याला संरक्षक भिंत व परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी तीन कोटी रुपये, राहूर कारवादेवी मंदिराचे सुशोभीकरण, रस्त्याचे कॉंक्रिटीकरण आणि शौचालये बांधण्यासाठी तीन कोटी रुपये आणि लोनाड येथील खंडेश्वरी महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणासाठी एक कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, या कामांना स्थगिती देण्यात आली होती.

फडणवीस, महाजन यांना पत्र

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी या प्रश्नाची दखल घेऊन राज्य सरकारकडे विनंती केली होती. त्यानुसार या कामांवरील स्थगिती उठली आहे. वज्रेश्वरी मंदिरासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना पत्र पाठविण्यात आले आहे.

vajreshvari.
Thane Politics : शंभूराज देसाईंना डावललं? भाजपच्या चव्हाणांना मिळाला झेंडावंदनाचा मान, पुन्हा राजकीय चर्चांना उधाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com