वज्रेश्वरी: येथे दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

वज्रेश्वरी - गेले काही दिवसांपासून येथील वज्रेश्वरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कडून येथील वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली या तीर्थक्षेत्रला मातीमिश्रित गढुळ व शेवाळ युक्त पाणी पुरवठा होत असून, तो देखील कमी दाबाने अत्यल्प वेळ होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

वज्रेश्वरी - गेले काही दिवसांपासून येथील वज्रेश्वरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कडून येथील वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली या तीर्थक्षेत्रला मातीमिश्रित गढुळ व शेवाळ युक्त पाणी पुरवठा होत असून, तो देखील कमी दाबाने अत्यल्प वेळ होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

या पाणी पिवळसर पाण्याला दुर्गंधी येत असून, पाण्याची चव देखील बिघडली आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यापासुन पोटाचे तसेच विविध आजार होण्याची भीतीपोटी जारचे पाणी विकत घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. या भागला पाणी पुरवठा योजने अंतर्गत पाणी दिले जाते, मात्र येथील कर्मचारी फ़क्त तीन असल्याने येथील नळ पाणी योजने चा बोजवारा उडाला आहे. येथील काही कर्मचारी नुकतेच सेवानिवृत झाले असल्याने त्यांच्या जागी जिल्हा परिषद ने कर्मचारी न भरल्याने ही पाणी योजना कोलमडून पडली आहे.तसेच या ठिकाणी गेले काही महिन्या पासून फिटकरी नसल्याने पाण्यात टाकली जात नाही तसेच साधन सामग्री हत्यारे नसल्याने पाइप लाइन दुरुस्ती करता कर्मचारी ना मोठी अड़चन येत आहे  या ठिकाणी गेले कित्येक वर्षा पासून येथील फ़िल्टर प्लांट बंद आहे तसेच टीसीएल पाउडर नाही त्यामुळे थेट नदीतील पाणी उचलून गावंना पुरवठा केला जात आहे. नागरीक दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारास बळी पडण्याआधी पंचायत समिति भिवंडी यांनी साठ वर्ष जूनी असलेल्या या योजनेवर तातडीने पाणी पुरवठ्यावर लक्ष्य केंद्रित करून नवीन फ़िल्टर प्लांट बसविन्यात यावा करण्याची मागणी शिवसेनेचे उपतालुका सचिव भूपेंद्र शाह यांनी केलीआहे. केवळ पाणी पट्टीत वाढ करण्यापेक्षा नागरिकांना पुरेशा दाबाने नियमितपणे स्वच्छ व शुध्द पाणी पिण्यास उपलब्ध करून द्यावे व नागरीकांना आजारी पडण्यापासुन वाचवावे अशी मागणी भूपेंद्र शाह यांनी निवेदन द्वारे केली आहे.

Web Title: Vajreshwari: poluted water supply here