Valentine Day : "मग तू कालंच लाल गुलाब का नाही घेतलं..."

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 February 2020

  • प्रेमदिनाच्या पुर्वसंध्येला प्रेमाला भरती 
  • बाजारातून लाल गुलाबं संपली 
  • प्रेमविरांनी गुलाबी गुलाबावर दिवस काढला 

मुंबई : लाल गुलाब आणि व्हॅलंटाईन डेचा संबंध सर्व श्रुत आहे. मात्र, व्हॅलंटाईन डेच्या पुर्व संस्थेला मुंबईच्या बाजारातून लाल गुलाबं संपली होती. सकाळी एका लाल गुलाबाचा भाव 20 रुपयांपर्यंत पोहचला होता. संध्याकाळ पर्यंत बाजारातून ही लाल गुलाबच संपली होती. 
दादरच्या फुल बाजारात 15 लाल गुलाबांची जुडी नेहमी 30 ते 35 रुपयांना विकली जाते. मात्र, आज 60 रुपयांपर्यंत भाव गेला होता. तर, किरकोळ बाजारात एका फुलाला 20 रुपये मोजावे लागत होते. नेहमी एक फुल 5 ते 7 रुपयांना मिळते. लाल गुलाबाने एवढा भाव खाऊनही प्रेमविरांची चांगलीच पसंती मिळाली होती. दुपार पर्यंत मुंबईच्या सर्वच बाजारातून लाल गुलाबं संपली होती.

मोठी बातमी - नावाला 'फॅमिली स्पा',आतमध्ये सुरु असायचं नुसतं टुक टुक..  

गुलाबी रंगाचे गुलाबाची जुडी 30 रुपये मात्र लाल गुलाबाला मागणी म्हणून त्याचे दर 60 रूपये होते. व्हॅलेनटाईन डे सोडून इतर दिवशी लाल गुलाबाची जुडी 35 ते 40 रुपयाला विकली जाते. व्हॅलेटटाईन डे म्हणून विक्रेत्यांनी 20 रुपयांने दर वाढवले आहेत. दोन जुड्या घेतल्यास 100 रुपयांना जुडी पडत होती. 

लाल आणि गुलाबी गुलांच्या प्रत्येकी 20 जुड्या होत्या.लाल गुलाबं दुपारीच संपली. तर, गुलाबी फुलाच्या जुड्या संध्याकाळ पर्यंत अवघ्या तीनच शिल्लक राहील्या आहेत. त्याही संपतील. लाल गुलाब सगळीकडेच संपली आहेत. त्यामुळे आता लोकं गुलाबी फुलं घेत आहेत असे दादर फुल बाजारातील अशोक फ्लॉवरवाला यांनी माहिती दिली.

मोठी बातमी - ऐकावं ते नवलंच, आता झालाय 'कंडोम स्कॅम', वाचा पूर्ण बातमी..

शहरातील अनेक ठिकाणी ही परीस्थीती होती. आजचा दिवस खास आहे. चॉकलेट आणि लाल गुलाब हवचं 20 रुपयांचं हे एक गुलाब आहे. पण, पर्याय नाही असे प्रथमेश जोशी या तरुणाने सांगितले. तर, प्रभादेवी येथील एका फुल विक्रेत्यानेही लाल गुलाबाची फुल दुपार पर्यंतच संपली असल्याचे सांगितले. 

valentines day scarcity of red roses in mumbai dadar flower market 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: valentines day scarcity of red roses in mumbai dadar flower market