नावाला 'फॅमिली स्पा',आतमध्ये सुरु असायचं नुसतं टुक टुक..  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 February 2020

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने सीबीडी सेक्टर-11 मधील ब्लीस स्पा वेलनेस फॅमिली स्पा ऍन्ड सलुनवर छापा मारुन मसाजच्या नावाखाली अश्लिल चाळे व अनैतिक धंदे करणाऱया दोन महिलांना तसेच सदर स्पाच्या चालक आणि व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करुन चारही महिलांना ताब्यात घेतले आहे. 

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने सीबीडी सेक्टर-11 मधील ब्लीस स्पा वेलनेस फॅमिली स्पा ऍन्ड सलुनवर छापा मारुन मसाजच्या नावाखाली अश्लिल चाळे व अनैतिक धंदे करणाऱया दोन महिलांना तसेच सदर स्पाच्या चालक आणि व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करुन चारही महिलांना ताब्यात घेतले आहे. 

मोठी बातमी - ऐकावं ते नवलंच, आता झालाय 'कंडोम स्कॅम', वाचा पूर्ण बातमी..

सीबीडी सेक्टर-11 मधील पुनित टॉवर इमारतीत असेलल्या ब्लीस स्पा वेलनेस फॅमिली स्पा ऍन्ड सलुनमध्ये मसाजसाठी येणाऱया ग्राहकांकडून एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली बीभत्स व अश्लिल चाळे करण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी या स्पावर छापा मारण्याचे आदेश दिले होते.

Inside Story - हवाला व्यवसाय कसा चालतो?

त्यानुसार अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने गत मंगळवारी सायंकाळी ब्लिस स्पा वेलनेस फॅमिली स्पा ऍन्ड सलुनमध्ये बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करुन या स्पावर छापा मारला. यावेळी सदर स्पामध्ये कामास असलेल्या महिलेकडून एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली ग्राहकासोबत अश्लील व बीभत्स चाळे करण्यात येत असल्याचे आढळून आले.

मोठी बातमी - चेंजिंग रुममध्येच तिने बसवला 'तिसरा डोळा' आणि म्हणाली 'ड्रेस ट्राय करो'...

पोलिसांनी सदर स्पामध्ये मसाजसाठी ठेवण्यात आलेल्या दोन महिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी सदर 'स्पा'ची चालक आणि महिला व्यवस्थापक या दोघींवर गुन्हा दाखल करुन चारही महिलांना ताब्यात घेतेले. या स्पामध्ये मसाजसाठी येणाऱया ग्राहकांकडून एक्स्ट्रा सर्व्हीसच्या नावाखाली जी रक्कम घेतली जात होती, त्यातील अर्धी रक्कम मसाज करणाऱया महिलांना दिली जात होती, तर उर्वरीत अर्धी रक्कम मसाज चालक घेत असल्याचे चौकशीत आढळुन आले आहे. या मसाज चालक महिलेकडे सदर मसाज पार्लरची कुठल्याही प्रकारची कागदपत्रे देखील नसल्याचे आढळुन आले आहे.  

navi mimbai police seized bliss spa wellness family spa in belapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navi mimbai police seized bliss spa wellness family spa in belapur