Vande Bharat Express : खुशखबर आता मुंबईत 'वंदे मेट्रो' लोकल धावणार!

वातानुकूलिकरणाचा मार्ग अखेर मोकळ; रेल्वे बोर्डाचे एमआरव्हीसीला आदेश!
Vande Bharat Express mumbai local vande train railway
Vande Bharat Express mumbai local vande train railwayesakal

मुंबई : मुंबईरांचा लोकल प्रवास आरामदायी करण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने वंदे भारतचा धर्तीवर आता वंदे मेट्रो सुरु करण्याचा निर्णय भारतीय घेतला आहे. शुक्रवारी मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी प्रकल्पातंर्गत २३८ वंदे मेट्रो (उपनगरी) बांधणीला रेल्वे मंडळाने मंजुरी दिलेली आहे. याबाबतचे पत्र रेल्वे मंडळाने मुंबई रेल्वे विकास महामंडळाला शुक्रवारी पाठवले.

मेड इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेन हिट ठरली आहे. आता त्याच पाठोपाठ रेल्वे बोर्डाने वंदे भारत मेट्रो ट्रेनची बांधणी सुरु करण्यात आली आहे. या वर्षीचा डिसेंबरपर्यत वंदे मेट्रो ट्रेन प्रवाशांचा सेवेत दाखल होती. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी शहरांतर्गत प्रवासासाठी वंदे मेट्रो संकल्पनांना जाहीर केली होती.

याशिवाय मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी नुकताच सांगितले की, रेल्वे बोर्ड शहरात वंदे भारत प्रकारच्या लोकल गाड्या चालविण्याच्या शक्यतेचा विचार करत आहे. आता रेल्वे बोर्डाने वंदे भारतचा धर्तीवर आता वंदे मेट्रो सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या वंदे मेट्रोल उपनगरील लोकल सेवा म्हणून चालविण्यात येणार आहे.रेल्वे बोर्डाने मंजूर केलेल्या एमयुटीपी ३ आणि एमयुटीपी ३ अ अंतर्गत २३८ वंदे मेट्रो लोकलची खरेदी मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे.

Vande Bharat Express mumbai local vande train railway
Vande Bharat Express : महाराष्ट्राला मिळणार पाचवी वंदे भारत ट्रेन; कसा असणार मार्ग?

कारेशड उभारणार-

वातानुकूलित लोकलच्या देखभालीसाठी मुंबई महानगर प्रदेशात दोन नवे कारशेड उभारण्यात येणार असून यासाठी जागेची निश्चिती करण्यात आलेली आहे. मेक इन इंडिया मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे तंत्रज्ञान भागीदाराद्वारे वातानुकूलित लोकलची बांधणी करण्यात येणार आहे.

सर्व लोकल होणार वंदे मेट्रो-

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्पात (एमयूटीपी) मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी एकूण २३८ वातानुकूलित लोकल बांधण्याचे प्रस्तावित आहे. यात एमयूटीपी-३ मधील ४७ आणि एमयूटीपी-३ अ मधील १९१ वातानुकूलित लोकलचा समावेश आहे. आता या सर्व लोकल वंदे मेट्रो असणार आहे.

Vande Bharat Express mumbai local vande train railway
Mumbai News : पश्चिम रेल्वेवर १४ तासांचा मेगाब्लॉक! हार्बर मार्गावरील अनेक लोकल सेवा रद्द

रेल्वे बोर्डाने मंजूर केलेल्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्पात (एमयूटीपी) अंतर्गत २३८ रेक एमआरव्हीसीकडून खरेदी केली जाईल. खरेदी संपूर्ण ३५ वर्षांसाठी रेकच्या देखभालीच्या आवश्यकतेसह असेल.

- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मुंबई रेल्वे विकास महामंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com