Vande Bharat Express : मुंबई-सोलापूर वंदे भारतचं तिकीट किती असणार? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vande Bharat Express

Vande Bharat Express : मुंबई-सोलापूर वंदे भारतचं तिकीट किती असणार? जाणून घ्या

मुंबई ते सोलापूर वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला आज पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते उदघाटन करणार आहे. आजपासून सर्वसामान्य प्रवाशांना वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचे तिकीट आरक्षित करतात येणार आहे पण तुम्हाला माहिती आहे का वंदे भारतची तिकीट किती असणार? आज आपण या विषयीच सविस्तर जाणून घेऊया. (Vande Bharat Express mumbai solapur train ticket price )

ही देशातील ९वी वंदे भारत ट्रेन असेल. या गाडीची ताशी 160 किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता असली तरी सर्वसाधारण मार्गावर 100-120 किमी तर घाट परिसरात ताशी 55 किमी वेगाने चालवण्यात येणार आहे.

या एक्सप्रेसमुळे सीएसएमटी आणि सोलापूर दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढेल. सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूरजवळील पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी यांसारख्या तीर्थक्षेत्रांशी जलद कनेक्टिव्हिटी होईल.सुपरफास्ट ट्रेनला 7 तास 55 मिनिटे लागतात तर वंदे भारतला 6 तास 30 मिनिटे लागतील

मुंबई-सोलापूर वंदे भारतचं तिकीट किती असणार?

या वंदे भारत ट्रेनने मुंबईहून पुण्यापर्यंत जर प्रवास केला तर प्रवाशांना चेअर कार अर्थात सीसीसाठी 560 रुपयाच तिकीट काढावं लागणार आहे. तसेच मुंबईहून थेट सोलापूर पर्यंत जर प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना सीसी अर्थातच चेअर कार साठी 965 रुपये एवढे तिकीट काढावे लागणार आहे.

तसेच मुंबई ते पुणे एक्झिक्युटिव्ह चेअर अर्थात ईसीसाठी 1135 रुपये भाडं आकारण्यात येणार तर मुंबई सोलापूरसाठी 1970 रुपयाचे तिकीट लागणार आहे.