PM Modi In Mumbai : मोदींच्या स्वागतासाठी मरोळ येथे बोहरी मुस्लीम बांधव सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi In Mumbai

PM Modi In Mumbai : मोदींच्या स्वागतासाठी मरोळ येथे बोहरी मुस्लीम बांधव सज्ज

PM Modi In Mumbai : अंधेरी येथील मरोळ येथे आता बोहरी समाजाच्या सैफी अॅकेडमी संकुल या शैक्षणिक संस्थेच्या उद्धाटन प्रसंगी नरेंद्र मोदी लवकरच हजर होणार आहे. या संकुलाला अल जामिया तौस सफिया समुदायही म्हणतात.

या ठिकाणी मोदींच्या स्वागतासाठी बोहरी मुस्लीम बांधव सज्ज आहे. त्यांचा मद्रास बँड मोदींचे स्वागत करण्यास तयार आहे. जे तरुण बँड वाजवत आहे ते चेन्नई मद्रासहून आलेले आहेत. त्यांच्या हाती असलेल्या विविध प्रकारच्या वाद्याद्वारे ते स्वागत करणार आहे.

मुंबई ते सोलापूर वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यानिमित्त मोदी आज मुंबईत आहे. या उद्धाटनासोबत ते अनेक विकास कामाचंही उद्धाटन करणार. अंधेरी येथील मरोळ येथे आता बोहरी समाजाच्या एका शैक्षणिक संस्थेचंही उद्धाटन करण्यात येणार

आजपासून सर्वसामान्य प्रवाशांना वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचे तिकीट आरक्षित करतात येणार आहे.  ही देशातील ९वी वंदे भारत ट्रेन असेल. या गाडीची ताशी 160 किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता असली तरी सर्वसाधारण मार्गावर 100-120 किमी तर घाट परिसरात ताशी 55 किमी वेगाने चालवण्यात येणार आहे.