
Vande Bharat :अजूनही तिकीट दर ठरले नाहीत! मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस उद्यापासून धावणार!
मुंबई : गोवा-मुंबई वंदे भारत ट्रेन आजपासून प्रत्येक्षात धावणार आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव प्रत्यक्ष उपस्थित राहून हिरवा झेंडा दाखवणार आहे.
मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचे रेल्वेकडून वेळापत्रक आणि गाडी नंबर जाहीर करण्यात आलेला आहे. परंतु, अजूनही वंदे भारत ट्रेनचे तिकीट दर निश्चित झालेला नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमांचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शनिवारी (ता. ३ जून) रोजी मडगांव - सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. शुक्रवार वगळता आठवड्यातील सहा दिवस ही ट्रेन धावणार आहे. सीएसएमटी स्थानकातून पहाटे ५. २५ ला सुटलेली वंदे भारत मडगांवला दुपारी १ वाजून १० मिनिटांनी पोहचणार आहे.
तर परतीच्या प्रवासासाठी मडगांवहुन दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी निघालेली ट्रेन रात्री १० वाजून २५ मिनिटांनी सीएसएमटीला पोहचणार आहे. ५८६ किलोमीटरचे अंतर हि गाडी ८ तासात पार करणार आहे. दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम स्थानकांवर थांबणार आहे. उद्घाटनानंतर प्रत्यक्षपणे सर्वसामान्य प्रवासासाठीही वंदे भारत ट्रेन रविवारपासून धावणार आहे.

वंदे भारत तिकीट दर ठरेना ?
मुंबई -गोवा वंदे भारत ट्रेनचे तिकीट दर अगोदरच प्रसार माध्यमावर व्हायरल होत आहे. यामध्ये चेअर कारसाठी दीड हजार तर एक्झिक्यूटिव्ह क्लाससाठी अडीच हजार रुपये तिकीट दाखविण्यात येत आहे. त्यामुळे कोकणातील प्रवाशांनी या तिकीट दराविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
परिणाम रेल्वे बोर्डाने साधगीरीची भूमिका घेतली आहे. मुंबई गोवा वंदे भारत ट्रेनचे उदघाटन मुहूर्त आला तरही रेल्वे बोर्डाने अजूनही तिकीट दराची घोषणा केली नाही. त्यामुळे कोकणातील रेल्वे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातवरण निर्माण झालेला आहे.