भाजीपाला विकणाऱ्या आईचा मुलगा बनला इस्रोमध्ये शास्त्रज्ञ

Palghar
Palghar

मुंबई : मुंबईतील पालघर तालुक्यातील मायखोप (केळवे पूर्व) येथील एका आईने आपल्या मुलाला भाजीपाला विकून इस्रोमध्ये शास्त्रज्ञ बनवले आहे. वंदेश राजेश पाटील या २५ वर्षीय तरुणाने अत्यंत गरिब परिस्थितीत आईच्या अपार मेहनतीच्या आणि स्वत:च्या इच्छाशक्तीच्या जोरावर ही झेप घेतली आहे. 

चांद्रयान-२ अवकाशात झेपावत असतांना वंदेशच्या हातात आपली इस्रोमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाल्याचा मेल आल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. देशाला अंतरिक्ष संशोधनातील महत्त्वपूर्ण माहिती मिळवावी माहिती तंत्रज्ञानात आपण नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करावी, यासाठी इस्रोमधून देशातील अंगी गुणवत्ता आलेल्या तरुणांना इस्त्रोच्यावतीने नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या जातात. वंदेशची सन २०१७ मध्ये हुकलेली संधी पुन्हा प्राप्त झाल्यानंतर सोडायची नाही. ही मनाशी बांधलेली पक्की खूणगाठ प्रत्यक्षात उतरविण्यात त्याला यश मिळाल्याने तो खूपच आनंदित झाला आहे. 

पश्चिम रेल्वेच्या केळवे रोड स्थानकाच्या पूर्वेला असलेले मायखोप या छोट्याशा गावात वंदेश आपली आई व दोन भावासह राहतो. दहा वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. एका झोपडीत राहणाऱ्या या कुटुंबावर उदरनिर्वाहाचा मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या आपल्या कुटुंबाचा डोलारा ढळू द्यायचा नाही ही खूणगाठ मनाशी बांधून त्याच्या आईने श्राद्ध कार्यक्र माचे सोपस्कार पूर्ण केल्यावर डोक्यावर माशांची टोपली आणि हातात भाजीपाला घेऊन परिसरात विक्रीच्या व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून त्या माउलीने आपल्या तिन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण केले.

वंदेश याने वाणगाव आयटीआयमधून इन्फरमेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स चा अभ्यासक्रम पूर्ण केला. एप्रिल २०१७ मध्ये ऑनलाइनवर अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्र (इस्त्रो) मधून टेक्निशियन भरती ची जाहिरात त्याच्या वाचनात आली. त्याला इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यातही आले, मात्र दुर्दैवाने त्याची संधी हुकली होती. ती यावेळी पूर्ण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com