
मुंबई : भाजपच्या युती सरकारने मंजूर केलेला धारावी पुनर्विकास मास्टर प्लॅन हा पूर्णपणे अन्यायकारक आहे. हा मास्टर प्लॅन सर्वसमावेशक विकासाचा आराखडा नाही. अंधारात तयार केलेला, बहुसंख्य धारावीकरांच्या आशाआकांक्षा उद्ध्वस्त करणारा हा मास्टर प्लॅन तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.