वर्षा गायकवाडांचा विजयी चौकार | Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

मुंबई, ता. 24 : कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धारावी विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे यंदा देशभराचे लक्ष लागले होते. आदित्य ठाकरे, शेरा, ओवीसीसह खासदार राहूल गांधी यांनी प्रचारात उडी घेतल्याने येथील निवडणूक चुरशीची झाली होती. या चुरशीच्या लढतीमध्ये आमदार वर्षा गायकवाड यांनी सलग चौथ्यांदा विजयी चौकार मारत शिवसेनेच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्‍याने पराभूत केले.

धारावी पुनर्विकास प्रकल्प सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा मुद्दा बनवला. सेना भाजपा युतीमुळे आपला पराभव होउ शकतो. याची कूणकूण लागल्याने वर्षा गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीनंतर मतदारसंघ पिंजून काढला. गणशोत्सव, नवरात्रोत्सवात गायकवाड यांनी घराघरात जाउन प्रचार केला. याचा लाभ गायकवाड यांना मतमोजणीतून झाल्याचे दिसत आहे.

धारावी प्रकल्प डोळ्यासमोर ठेउन आणि कॉंग्रेसच्या गडाला सुरूंग लावण्यासाठी शिवसेनेने येथे आशिष मोरे यांना उमेदवारी दिली. शिवसेनेने प्रथमच या मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची केली. शिवसेना उमेदवार आशिष मोरे यांच्या प्रचारासाठी भर पावसात आमदार आदित्य ठाकरे यांनी रॅली काढली. त्यांच्या सोबत सलमान खानचा बॉडीगार्ड शेराही सहभागी झाला होता. यामुळे शिवसेनेनेही वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हान उभे केले.

कॉंग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्यासाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीप्रमाणे यंदाही खासदार राहूल गांधी यांना धारावीत प्रचारासाठी बोलविण्यात आले. गांधी यांच्या सभेला मिळालेल्या प्रतिसादामुळे कॉंग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. या सभेनंतरही वर्षा गायकवाड यांनी चौक सभा, रॅली यावर भर देत प्रत्येक घराघरात प्रचार केला. यातच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसला साथ दिली. ही कॉंग्रेससाठी जमेची बाजू ठरली. वर्षा गायकवाड यांनी स्वत: रात्र दिवस अथक परिश्रम केल्याने अखेर चौथ्यांदा विजय त्यांच्याच पदरात पडला आहे.

WebTitle : varsha gaikwad won from dharavi vidhansabha constituency for the forth time

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: varsha gaikwad won from dharavi vidhansabha constituency for the forth time