

Ancient Meets Modern: Vasai Artist Gives Indian Spiritual Literature a Unique Identity
esakal
-संदीप पंडित
विरार: कोरोना काळ अनेकांसाठी संकटाचा होता; पण काहींनी त्याच काळाला नव्या सर्जनशीलतेची दिशा दिली. वसईचे शिल्पकार मिलिंद राऊत यांनी या काळात भारतीय अध्यात्म, कला आणि संशोधन यांचा सुंदर संगम घडवत एक वेगळाच इतिहास रचला. त्यांनी ताडपत्रावर हनुमान चालीसा साकारली आणि त्यानंतर सर्वसामान्यांना सहज समजेल अशा भाषेत पोथी स्वरूपातील भगवद्गीता तयार करून एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला.