
विरार : पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पुलाप्रमाणेच वसईतील चिंचोटी पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती स्थानिक माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना ५ मे २०२५ रोजी पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली होती.