फरपट! रुग्ण वसईचा, उपचार मात्र बोईसरमध्ये 

कोरोना टेस्ट
कोरोना टेस्ट

विरार ः वसई तालुक्‍यात महापालिका असली, तरी काही भागात अजूनही ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग काम करत आहे. त्यांच्याकडे ना मोठे रुग्णालय आहे ना विलगीकरण कक्ष. त्यामुळे वसईतील ग्रामीण भागातील रुग्णांना बोईसर येथील टिमाच्या रुग्णालयात, तर विलगीकरणासाठीही बोईसर येथेच पाठवण्यात येत आहे. त्यामुळे एवढ्या लांब रुग्णांची सोय करण्या पेक्षा वसईमध्येच रुग्णांची सोय करावी, अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत वसईचे आमदार यांनी ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांची सोय आणि विलगीकरण कक्ष वसईमध्येच तयार करावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. 

मोठी बातमी स्थलांतरीत कामगारच नव्हे दुकानदारही मुंबईबाहेर चालले; वाचा बातमी सविस्तर

वसई तालुक्‍यात 14 ग्रामपंचायती आहेत, तर एक मोठी महापालिका आहे. सध्या कोरोनाचे संकट महापालिका आणि ग्रामीण भागात वाढत आहे. या स्थितीत कोरोनाच्या रुग्णावर जवळच्या ठिकाणी उपचार होणे गरजेचे असताना वसई तालुक्‍यात मात्र ग्रामीण आणि शहरी अशी रुग्णांची विभागणी झाल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत परिसरातील रुग्णांना वसईपासून 80 किलोमीटरवर असलेल्या बोईसर येथील टिमाच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. यापूर्वी ग्रामीण भागातील रुग्णांना वसईच्या रुग्णालयातही दाखल करण्यात येत होते,

तर विलगीकरणासाठी नागरिकांना विरार येथील म्हाडाच्या केंद्रात ठेवण्यात येत होते, परंतु आता विलगीकरणासाठीही बोईसरला पाठवले जात असल्याचे अर्नाळा ग्रामपंचायत परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. अर्नाळा ग्रामपंचायत परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्यांच्या नातेवाईकांना याचा मोठा फटका बसत आहे. 

वसईच्या ग्रामीण भागातील रुग्णांची सोय वसईमध्येच करावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. यातून लवकरच तोडगा निघेल. शेवटी हा ग्रामीण भाग ही पालिके प्रमाणेच माझ्या मतदार संघात येतो. त्यामुळे त्यांनाही उपचाराच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. 
- हितेंद्र ठाकूर, आमदार, वसई 

अर्नाळा ग्रामपंचायत परिसरातील कोरोना रुग्णांवर वसईमध्येच उपचार होणे गरजेचे आहे. यापूर्वी म्हाडाच्या विलगीकरण केंद्रात विलगीकरणा केले जात होते, परंतु आता तेही बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. 
- महेंद्र पाटील, उपसरपंच, अर्नाळा ग्रामपंचायत 

आतापर्यंत ग्रामीण भागातील नागरिकांना विलगीकरणासाठी बोईसर येथे ठेवण्यात येत होते. यापुढे वसईच्या ग्रामीण भागातील नागरिकांचे विलगीकरण वसई-विरारमध्येच करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. लवकरच अशी सुविधा आम्ही सुरु करू. 
- डॉ. मिलिंद चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी 

 

कोरोना टेस्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com