
विरार : मुखी ज्ञानोबा माउली तुकाराम आणि विठू माउलीचे नाव घेत वसईतील डॉक्टरांचा एक ग्रुप सद्या वारीला आलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्यात दंग झाला आहे. एरवी रुग्णाच्या गराड्यात असलेले डॉक्टर सद्या धोतर, सदरा, पायजमा ,डोक्यावर गांधी टोपी कपाळावर गंध लावून सकाळी ५ वाजल्या पासून वारीत चालून थकलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्यात रमले आहेत. हा ग्रुप गेली पाच वर्षा पासून वारकऱ्यांची मनोभावे सेवा करत आहे.