मराठ्यांच्या विजयाची साक्ष देणाऱ्या वसई किल्ल्यातील पुरातन वास्तूंचा हुंकार; पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष

Vasai Fort Heritage in Danger : पुरातत्व खात्याच्या दुर्लक्ष पणामुळे हा भुईकोट किल्ला आता अखेरचा श्वास घेत आहे.वसई किल्ल्यातील पुरातन वास्तूंचा हुंकार राज्य शासनाला कि पुरातत्व विढागाला ऐकु येत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया दुर्गप्रेमींकडून करण्यात येत आहे.
Vasai Fort Heritage in Danger

Vasai Fort Heritage in Danger

esakal

Updated on

विरार : वस‌ईचा भुईकोट किल्ला हा मराठ्यांच्या विजयाचे प्रतिक समजले जाते. या ऐतिहासिक किल्ल्यातील पुरातन वास्तू सद्यस्थितीत प्रशासकीय दुर्लक्षामुळे धोक्यात आल्याचे चित्र आहे. पोर्तुगीज काळात १५३०-४० च्या दशकात फ्रान्सिस्कन संप्रदायाच्या अंतर्गत किल्ल्याच्या आत बांधण्यात आलेल्या पहिल्या काही महत्त्वाच्या चर्चेसपैकी एक असलेल्या ‘फ्रान्सिस्कन’ चर्चच्या( संत अंतोनी चर्च)छताच्या अंतर्गत भागातील शिळा आता कोसळू लागल्या आहेत. यामुळे येथे येणाऱ्या हजारो पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पुरातत्व खात्याच्या दुर्लक्ष पणामुळे हा भुईकोट किल्ला आता अखेरचा श्वास घेत आहे.वसई किल्ल्यातील पुरातन वास्तूंचा हुंकार राज्य शासनाला कि पुरातत्व विढागाला ऐकु येत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया दुर्गप्रेमींकडून करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com