

Married Man Dies In Vasai Lodge After Staying With Girlfriend
Esakal
पालघर जिल्ह्यातल्या वसई इथं प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या विवाहित तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. वसईतील कळंब परिसरात तरुण प्रेयसीसोबत लॉजवर गेला होता. त्यावेळी अचानक त्याचा मृत्यू झाल्यानं वसईत खळबळ उडाली आहे. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे. एनर्जी ड्रिंग आणि धूम्रपानाचं व्यसन तरुणाला होतं. त्याच्या अतिसेवनाने मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.