esakal | वसईच्या समुद्रातील बोट संशयाच्या भोवऱ्यात; स्थानिक यंत्रणा सतर्क
sakal

बोलून बातमी शोधा

boat in sea

वसईच्या समुद्रातील बोट संशयाच्या भोवऱ्यात; स्थानिक यंत्रणा सतर्क

sakal_logo
By
प्रसाद जोशी

नालासोपारा : वसई (vasai) तालुक्यातील भुईगाव समुद्रात एक अनोळखी संशयास्पद बोट (Doubtful Boat) आढळून आली असल्याची घटना समोर आली आहे ड्रोनची (Drone) मदत तपासणीसाठी घेण्यात आली असून समुदकिनारी (Beach) सुरक्षाव्यवस्था तैनात (security) करण्यात आली आहे. भुईगाव ,कळंब परिसराच्या 15 माईल अंतरावर ही बोट थांबलेली आहे. ही बोट खडकाला लागून थांबली असल्याची प्राथमिक माहिती (first information) मिळत आहे.

हेही वाचा: तलासरी येथे आठ लाखांचा मद्यसाठा जप्त; डहाणू उत्पादन शुल्क खात्याची कारवाई

कोस्टल गार्ड, मेरिटाईम बोर्ड आणि वसई पोलिसांनी बोटीच्या ठिकाणी पाहणी केली आहे. तसेच या घटनेची माहिती घेणे सुरू आहे. पण ही बोट कोणत्या दिशेने आली ? बोट कोणाच्या मालकीची तसेच तांत्रिक बिघाडामुळे थांबली की अन्य काही कारणे आहेत. याची चाचपणी स्थानिक पोलीस प्रशासन यंत्रणा करत असून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भुईगाव येथे आढळलेल्या बोटीबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती बंदर विभागाचे अधिकारी बी जी राठोड यांनी दिली तर समुद्रात अनोळखी संशयास्पद बोट आढळल्याचे समजताच मच्छिमार बांधव देखील धास्तावले आहेत.

loading image
go to top