वसईत शिवसेनेतर्फे आश्‍वासनांची खैरात

वसई ः वचननामा प्रकाशित करताना राजेंद्र गावित, रवींद्र फाटक, ईश्‍वर धुळे, विजय पाटील आदी.
वसई ः वचननामा प्रकाशित करताना राजेंद्र गावित, रवींद्र फाटक, ईश्‍वर धुळे, विजय पाटील आदी.

वसई  ः वसई विधानसभेचे महायुतीचे उमेदवार विजय पाटील यांचा वचननामा जाहीर करण्यात आला असून याद्वारे शिक्षण, आरोग्य व एसटी सुविधेसह विविध कामांबाबत आश्‍वासने देण्यात आली आहेत. वसई पूर्वेकडील आदित्य सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. महायुतीतील शिवसेना, भाजप, आरपीआय, आगरी सेनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 

आदिवासी समाजाला प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास घडवून आणू. वारली पेंटिंग, तारपा नृत्य, आदिवासी संगीत अशा सांस्कृतिक कुशलतेला उद्योगाचे स्वरूप देऊन रोजगार उपलब्ध करून देऊ. वसईत पर्यटन विकास साधण्यासाठी प्रयत्न केले जातील. यातून स्थानिकांना रोजगार मिळेल. कमी खर्चात शिक्षण उपलब्ध व्हावे, म्हणून सरकारकडे शिष्यवृत्तीसाठी पाठपुरावा केला जाईल. तसेच वसईतील तरुणांना उद्योगनिर्मितीसाठी प्रोत्साहन मिळावे, याकरिता प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत कार्यशाळा चालवू.

वसईत अत्याधुनिक आणि विविध सुविधांनी सज्ज नाट्यगृह उभारणी, पाण्याची समस्या सोडवणे, महिला बचत गटातून रोजगार मिळवून देणे, बंद झालेली एसटी सेवा सुरू करणे, वीज वितरण तारा भूमिगत करणे, सरकारी रुग्णालय उभारणे, महिला विशेष लोकल सेवेसाठी पाठपुरावा, बंधारा बांधणे, मच्छीमारांचे प्रश्‍न सोडवणे, वसईतील पुरातन वास्तूंचे जतन करणे, एमएमआरडीए प्रकल्प व बुलेट ट्रेनमुळे जर भूमिपुत्र उद्‌ध्वस्त होत असतील, तर त्याबाबत सरकार सकारात्मक विचार करील, आदी आश्‍वासने वचननाम्याद्वारे देण्यात आली आहेत. 

या वेळी शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, खासदार राजेंद्र गावित, उमेदवार विजय पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष ईश्‍वर धुळे, आगरी सेनेचे जनार्दन पाटील, भाजपचे केदारनाथ म्हात्रे, नगरसेविका किरण चेंदवणकर, भाजपचे केदारनाथ म्हात्रे, सायमन मार्टिन, ‘मी वसईकर अभियाना’चे मिलिंद खानोलकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com