
Summary
विरारमधील रमाबाई अपार्टमेंटचा भाग कोसळून आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून शोध व बचावकार्य सुरू आहे.
इमारतीतील ५० फ्लॅट्सपैकी सुमारे १२ फ्लॅट्स कोसळले असून २०-२५ जण ढिगाऱ्याखाली अडकले होते.
एनडीआरएफ, अग्निशमन दल व स्थानिक प्रशासनाने बचावकार्य वेगाने सुरू केले असून नागरिकांमध्ये हळहळ व शोककळा पसरली आहे.
वसई विरार महानगरपालिका हद्दीतील मौजे नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग मंगळवारी मध्यरात्री कोसळून दुर्घटना घडली यातील मृतांचा आकडा आता १५ वर पोहोचला असून शोधकार्य आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे. इमारतीचा चौथा मजला कोसळताच एक वर्षाच्या चिमुकलीसह तिघांचा मृत्यू झाला झाला आणि ढिगाऱ्यांखाली २० ते २५ जण गाडले गेले. आता पर्यंत १७ जणांचा बाहेर काढण्यात आले आहे यातील १५ जणांचा मृत्यू झाला आहे.