'अल्लाचा प्रकोप होईल'; भीती दाखवून लाखोंची फसवणूक

'अल्लाचा प्रकोप होईल'; भीती दाखवून लाखोंची फसवणूक

नालासोपारा :-जादूटोणा विरोधी कायदे दिवसागणिक कडक होत चालले आहेत, अंधश्रद्धेला बळी पडू नये यासाठी मोठ्याप्रमाणात जनजागृती ही सुरू आहे. असे असतानाही समाजात आजही अनेक जण भोंदूगिरीला बळी पडत असल्याचं वास्तव चित्र वसईत उघड झाले आहे.

एका भोंदूबाबाने अल्लाचा प्रकोप होईल अशी भीती दाखवून चक्क 15 लाख 59 हजार 550 रुपयाला एकाची फसवणूक केली असल्याची घटना उघड झाली आहे.याबाबत दोन जणांविरोधात वसई पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जादूटोणा अधिनियम कलम 3 प्रमाणे, संगनमत करून, फसवणूक केली असल्याचा गुन्हा दाखल करून, दोघांना अटक केली आहे.

मकसूद मोहम्मद हुसेन अन्सारी आणि असिफ इब्राहिम मेमन असे अटक करण्यात आलेल्या दोन भामट्याची नाव असून हे दोघेही वसईच्या पापडी परिसरातील राहणारे आहेत. वसई तील इलेक्ट्रिक व पलंबिग चे काम करणारे 49 वर्षीय फिर्यादीच्या मुलावर कोणत्या तरी प्रकारचा जादूटोणा करून, त्यास घरातील पैसे व सोन्या चांदीचे दागिने आणून दे अन्यथा तुझ्यावर अल्ला चा प्रकोप होईल अशी भीती घालून 15 लाख 59 हजार 550 रुपये किमतीचे 29.6 तोळे सोने, 1 लाख 50 हजार रुपये रोख घेऊन फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ वसई पोलीस ठाणे गाठून आरोपी विरोधात भादवी कलम 420, 34 सह महाराष्ट्र जादूटोणा अधिनियम कलम 3 प्रमाणे,गुन्हा दाखल करून आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीने आणखी किती जणांनी फसवणूक केली आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

vasai virar crime marathi lacks deceived by fear of God mumbai latest updates

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com