

Vasai-Virar to Get Metro Alongside Road Bridge
Sakal
विरार : मुंबई महानगरात वसई-भाईंदर क्षेत्रातून रोज लाखो नागरिक कामानिमित्ताने ये-जा करीत असतात सदर प्रवास करताना नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आता या ठिकाणी मेट्रो आणि रस्ता असा डबलडेकर चा प्रस्ताव दिल्ली मेट्रो कार्पोरेशन तयार करत असल्याचे समजते. नायगाव भाईंदर खाडीवर प्रस्तावित पुलाच्या कामात भाईंदर ते वसई मेट्रोचा समावेश केल्यास वाहतूक कोंडीच्या समस्येसोबत राष्ट्रीय महामार्ग 8 वरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून नागरीकांच्या वेळेची बचत होणार आहे.