

VVMC BJP and BVA Clash
ESakal
नालासोपारा : वसई-विरार महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी बविआ आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला. या वेळी एकमेकांची कॉलर पकडत धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. महापालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर ३९ विषय घेऊन पहिलीच महासभा शुक्रवारी (ता. २०) झाली. यात बुलेट ट्रेनचा विषय येताच एकमेकांच्या नेत्यांच्या घोषणा देत असताना झालेल्या वादावादीचे रूपांतर धक्काबुक्कीत होऊन प्रचंड गोंधळ उडाला. शेवटी महापौर अजीव पाटील यांना खुर्ची सोडून मध्यस्थी करत वाद मिटवावा लागला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.