
विरार : पालघर जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका असलेल्या वसई विरार महानगरपालिकेच्या मालमत्ता कराची वसुली पहिल्या तिमाही मध्ये १२० करोड रुपयांची वसुली केली आहे. मागच्या वर्षी मार्च अखेर पर्यंत पालिकेने ३९४ क्रोडची वसुली केली होती. गेल्यावर्षी जुलै अखेर १०० क्रोडची वसुली झाली होती. ते यावर्षी जून अखेर १२० करोड वसुली झाल्याने पालिकेच्या वसुली मध्ये सुधारणा झाल्याचे बोलले जात आहे.