VVMC: वसई-विरार महापालिकेतील कामे रखडली, पूर्णवेळ नगररचनाकार उपसंचालकाची मागणी

Vasai Virar Municipal Corporation Project Pending: वसई-विरार महापालिकेतील कामे रखडली असल्याचे समोर आले आहे. यामुळे पूर्णवेळ नगररचनाकार उपसंचालकाची मागणी करण्यात आली आहे.
vasai virar municipal corporation

vasai virar municipal corporation

sakal

Updated on

विरार : वसई-विरार महापालिकेतील नगररचना विभागाचे तत्कालीन उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्या निलंबनानंतर रिक्त झालेल्या पदावर सोलापूर महापालिकेतील उपसंचालक मनीष भिष्णूरकर यांना हा कार्यभार सोपवण्यात आला. मात्र, सोलापूर महापालिकेतून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नसल्याने फक्त आठवड्यातील तीनच दिवस ते महापालिकेत उपस्थिती दर्शवत असल्याने महापालिका क्षेत्रातील असंख्य नागरिकांची कामे रखडल्याचे चित्र सध्या येथे पाहण्यास मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com