

State Information Commission orders ₹50,000 compensation to an RTI applicant for physical, mental and financial hardship.
sakal
विरार : आचोळे येथील नियोजित डम्पिंग ग्राउंड मध्ये बांधलेल्या अनधिकृत 246 इमारतींबाबत पाठवलेल्या एमआरटीपी नोटीशि बाबत महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा अर्ज करूनही दीर्घकाळ माहिती न दिल्याप्रकरणी राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठाने वसई-विरार शहर महानगरपालिकेला चांगलेच धारेवर धरले आहे. आरटीआय अर्जदार अजय किशोरलाल शर्मा यांना माहिती मिळविण्यास झालेल्या त्रासाची भरपाई म्हणून महापालिकेने ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश आयोगाने दिला आहे. तसेच माहिती देण्यात कसूर केल्याप्रकरणी दोन तत्कालीन जनमाहिती अधिकाऱ्यांवर प्रत्येकी २५ हजार रुपये शास्ती लादण्यात आली आहे.