esakal | विरारमध्ये तानसा नदीपात्रात तीन तृतीयपंथी बुडाले | Transgender
sakal

बोलून बातमी शोधा

Drowned

विरारमध्ये तानसा नदीपात्रात तीन तृतीयपंथी बुडाले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा : विरार पूर्व खानिवडेजवळील तानसा नदीच्या (Tansa river) खाडीपात्रात दुर्गा पूजेनिमित्त डुबकी मारण्यासाठी गेलेल्या सहा तृतीयपंथींपैकी (transgender drowning) तीन जण बुडाल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजता घडली. वसई-विरार महापालिकेच्या (vasai-virar municipal) अग्निशमन दलाचे जवान, मांडवी पोलीस आणि स्थानिकांनी सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेतला; पण ते सापडले नाहीत.

हेही वाचा: मुंबईतील रुग्णवाढीवर लक्ष; चार वेळा रुग्णसंख्या पाचशेच्या वर

सुनीता गोणामुडी ऊर्फ पुरी (वय २७), हारिका अंदुकोरी (३९), प्राची आकुला (२३) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. बुधवारी सर्वपित्री अमावस्येनंतर गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता दुर्गा पूजेच्या पहिल्याच दिवशी खानिवडे येथील सहा तृतीयपंथी दुर्गापूजन करून आंघोळीसाठी तानसा नदीपात्रात डुबकी मारण्यासाठी उतरले होते. सकाळी नदीला भरती होती. त्यात पाण्याचा अंदाज न आल्याने आणि खाली दलदल असल्याने सहापैकी तीन जण पाण्यात बुडाले.

इतर तीन जणांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला; पण किनाऱ्यावरील दलदलीमुळे त्यांना वाचविता आले नाही. वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवान, मच्छीमारांना पाचारण करून सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेतला; पण ते सापडले नाहीत, असे मांडवी परिक्षेत्राचे पोलिस निरीक्षक दिलीप राख यांनी सांगितले.

loading image
go to top