वसईतील 'भुताचे झाड' नामशेष होण्याच्या मार्गावर; चांदण्या रात्री...

Sterculia urens tree
Sterculia urens treesakal media

विरार : "रात्रीस खेळ चाले या गुढ सावल्यांचा" हे गाणे आपण ऐकतो आणि अंगावर काटा उभा राहतो . पण एखाद्या झाडा मुळे (Tree in vasai) रात्रीस असे दृश्य बघायला मिळाले तर .. अंगावर काटाच येईल. असेच एक झाड वसईच्या हिरा डोंगरी (वज्रगड ) गिरीज परिसरात दिसून येते. दुर्मिळआणि नामशेष होणाऱ्या वृक्षापैकी एक भुत्या झाड (कांडोळं ) शास्त्रीय नाव -स्टरक्युलीया युरेन्स (Sterculia urens tree) , हे झाड म्हणजे , चित्रकारांना चित्रास आव्हान देणारे, हे झाड, वसई परिसरात छायाचित्रकार, निसर्गप्रेमीना वा कुणालाही आवडेल अशी खूप सारी झाडे पहायला मिळतात. कोड असलेल्या त्वचे प्रमाणे दिसणारे हे झाड म्हणून कदाचित भुताचे झाड (Ghost tree) म्हणून ओळखले जात असावे.

Sterculia urens tree
मुंबईत मृत्यूचे प्रमाण वाढते, तर जन्मदरात घट; BMC आरोग्य विभागाची माहिती

चांदण्या रात्री पाहिले तर हे झाड उजळून निघाल्या सारखे वाटते या झाडाच्या फांदया जाडसर विविध आकार असल्याने रात्री त्या भुतासारख्या वाटत असाव्यात इतकेच,वस्तूता तसे काही नाही.अशी माहिती डॉ.देवेंद्र भोईर यांनी सकाळशी बोलताना दिली. कुळ-स्टरक्युलीएसी कांडोळाच झाड नितळ, पांढऱ्या बदामी रंगाचे असते.या झाडाचे मूळ हे भारतीय आहे, या झाडाला केवळ वर्षाऋतूतच मोठी पाने म्हणजे जवळजवळ एक फुट व्यासाची पंचकोनी पाने येतात . पावसाळा ओसरताच ती पाने अंतर्धान पावतात. याची फुल शेवाळी लालसर छटेची . नरपुष्प आणि स्री पुष्प भिन्न–भिन्न आणि मग येणारी फळ हिरवी आणि मग काळपट लाल अशी पाच फुगीर पाकळ्या असाव्यात तशी. त्याच्या पृष्ठभागावर खाजरी-बोचरी लव असते.

tree in vasai
tree in vasaisakal media

डिंक औषधी मानला जातो, नैसर्गिक कामोत्तेजक म्हणूनही त्याचा वापर आयुर्वेदात आढळतो.सौंदर्य प्रसाधनात हीं ह्याच्या डिंकाचा वापर केला जातो. परंतु आता हे झाड खूप विरळा होऊ लागले आहे. वसईतील काही मोजक्याच ठिकाणी आता हि झाडे दिसून येत आहेत.पालघर जिल्ह्यात आणि वसई तालुक्यात अनेक अशी झाडे आहेत. परंतु हि झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने ती वाचविण्यासाठी आता प्रयत्न करावे लागणार असल्याचे डॉ. देवेंद्र भोईर यांनी सांगितले .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com