Navi Mumbai: तुटलेली उपकरणे अन् गंजलेली संरचना, डॉग पार्कची दुरवस्था; पाळीव प्राण्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Vashi Dog Park Bad Condition: वाशी येथे लाखो रुपये खर्च करून डॉग पार्क उभारलेले आहे. मात्र यामुळे पाळीव प्राण्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र समोर आले आहे.
Vashi Dog Park Bad Condition

Vashi Dog Park Bad Condition

ESakal

Updated on

तुर्भे : नवी मुंबई महापालिकाने लाखो रुपये खर्च करून वाशी येथे उभारलेले शहरातील एकमेव डॉग पार्क सध्या दुरवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे. पाळीव कुत्र्यांच्या व्यायाम व प्रशिक्षणासाठी उभारण्यात आलेली उपकरणे मोडकळीस आली असून, लोखंडी संरचनांना गंज लागला आहे. लाकडी फळ्या तुटलेल्या अवस्थेत असल्याने खेळताना प्राण्यांना दुखापत होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com