वाशी रुग्णालयातील आपत्कालीन कक्ष बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

वाशी रुग्णालयातील आपत्कालीन कक्ष बंद असून, एखादी नैसर्गिक आपत्ती कोसळली, तर रुग्णांना ठेवणार कुठे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नवी मुंबई ः वाशी रुग्णालयातील आपत्कालीन कक्ष बंद असून, एखादी नैसर्गिक आपत्ती कोसळली, तर रुग्णांना ठेवणार कुठे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पावसाळ्यात महापूर आल्यानंतर दरड कोसळणे, घर कोसळणे, पुरात नागरिक वाहून जाण्याची भीती असते. तसेच नागरिक जखमी होण्याची शक्‍यता जास्त असते. अशा वेळेला आपत्कालीन कक्ष असणे गरजेचे आहे; येथील आपत्कालीन कक्ष आजही बंद अवस्थेत आहे. बाह्य रुग्ण तपासणी केंद्रात दररोज ४०० ते ५०० रुग्ण हजेरी लावत आहेत. त्यामध्ये बऱ्याच रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असते; परंतु उपलब्ध असणारी जागा कमी पडत असल्यामुळे नागरिकांना मुंबईमधील सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. दयानंद कटके यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

पावसाळ्यात दुर्घटना घडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळे आपत्कालीन कक्ष २४ तास पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असणे आवश्‍यक आहे; परंतु मनपाचा आपत्कालीन कक्ष बंद असेल, तर चौकशी करून सुरू करण्यास सांगण्यात येईल.
- वैशाली नाईक, आरोग्य समिती सभापती, महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vashi hospital emergency room closed